Jalna : जिल्ह्यातल्या रांजणी परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान;तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकर्यांची मागणी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, March 20, 2026

Jalna : जिल्ह्यातल्या रांजणी परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान;तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकर्यांची मागणी


  जिल्ह्यातल्या रांजणी परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान;तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकर्यांची मागणी 

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी परिसरात अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय.. जिल्ह्यात दोन दिवस बेमोसमी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार काल सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. तर अनेक भागात वादळी वार्यासह गारपीट झालीये. त्यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथे काढणीला आलेला गहू, ज्वारी, तूर, कांदा पिके अक्षर: आडवे झाले आहेत. त्यामुळं तात्काळ शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

Post Top Ad

-->