Jejuri जेजुरी गडावर गुढीपाडव्याचा जल्लोष; खंडोबा देवाची महापूजा आणि गडावर आकर्षक फुलांची सजावट - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

Jejuri जेजुरी गडावर गुढीपाडव्याचा जल्लोष; खंडोबा देवाची महापूजा आणि गडावर आकर्षक फुलांची सजावट


  जेजुरी गडावर गुढीपाडव्याचा जल्लोष; खंडोबा देवाची महापूजा आणि गडावर आकर्षक फुलांची सजावट

 आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर भक्तिमय वातावरणात सण साजरा करण्यात आला. पहाटेच्या मंगल समयी खंडोबा देवाची पारंपरिक पद्धतीने महापूजा संपन्न झाली. त्यानंतर मुख्य गाभाऱ्याची विशेष पाखळणी करण्यात आली.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मुख्य गाभारा आणि मंदिर परिसरात विविध प्रकारच्या सुगंधी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुशोभित आणि प्रसन्न दिसत होता.

नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गडावर मोठी गर्दी केली होती. परंपरेनुसार, खंडेरायाची मानाची गुढी देवसंस्थानच्या माननीय विश्वस्त मंडळाच्या हस्ते उत्साहात उभारण्यात आली.

यावेळी देवसंस्थानचे अध्यक्ष मंगेश घोणे तसेच देवसंस्थानचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.


Post Top Ad

-->