रायगड जिल्ह्यातील महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शतक महोत्सवी वर्षाची आज सुरुवात झाली. २० मार्च १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरोधात दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ लाखो भीमअनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी आणि पाणी फिल्टर योजनेसाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
इतिहासातील सामाजिक क्रांतीची साक्ष असलेल्या महाड भूमीत आज पुन्हा एकदा लाखोंच्या उपस्थितीत अभिवादनाचा सोहळा पार पडला.
.jpg)