कल्याण-डोंबिवली महापालिकेचा २०२६-२७ सालासाठी ३ हजार १८६ कोटी ६० लाख रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेत सादर केला. कोणतीही करवाढ न करता सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात नागरी सुविधांसह विविध विकास प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षाच्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार ५७२ कोटी ७६ लाख रुपयांची शिल्लकही दाखविण्यात आली आहे.
करवाढ टाळत विकासकामांवर भर देणारा हा अर्थसंकल्प नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे चित्र आहे.
.jpg)