
चार वर्ष जुना रहस्य उलगडला : मेहकर खून प्रकरणात ४ आरोपी अटकेत
मेहकर तालुक्यातील ४ वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या व्यक्तीच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून या प्रकरणात आणखी २ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २१ एप्रिल २०२६ रोजी पोलीस तपासादरम्यान विनोद आश्रुबा नवले, वय ३८ वर्ष, रा. सुकळी ता. मेहकर जि. बुलढाणा यांचा मृतदेह जामगाव शिवारातील शेतातून खोदून काढण्यात आला. या कारवाईवेळी मेहकरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, नायब तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी तसेच शासकीय पंच व मयताचे नातेवाईक उपस्थित होते.
तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, मयताचा कट रचून खून करण्यात आला होता. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरून त्यावर सिमेंटचा कोबा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात यापूर्वी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली होती. सुनिल बाजीराव जाधव, रा. सुकळीसचिन ज्ञानेश्वर उगले, रा. मेहकरपोलीस कोठडीदरम्यान चौकशीत आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत.पवन रामचंद्र घेवंदे, रा. मेहकर (सध्या छत्रपती संभाजीनगर)अंकुश दत्तात्रय बोडखे, रा. जामगावतपासात असे निष्पन्न झाले की सर्व आरोपींनी मिळून पूर्वनियोजित कट रचून धारदार शस्त्राने खून केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मेहकर परिसरात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस तपास अधिक वेगाने सुरू आहे. अधिक अपडेट्ससाठी आमच्याशी जोडलेले रहा.