रीलच्या नादात भीषण अपघात — दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, 25 जखमी
बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर आज सकाळी सहाच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बसचा चालक आणि वाहक हे मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त होते, त्यातूनच हा अपघात झाल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. बसचा ताबा सुटल्याने ती पुढील कारवर आदळली, ज्यामुळे कारचेही मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे तब्बल एक तास डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत आक्रोश केला.सध्या गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, चालक-वाहकांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
.jpg)
.jpg)
.jpg)