Chandvad : शिंगवे येथे अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, April 3, 2026

Chandvad : शिंगवे येथे अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल


शिंगवे येथे अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल

 चांदवड तालुक्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे तसेच पालेभाज्यांमध्ये समावेश असलेल्या दोडक्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी आत्माराम बोरसे यांनी गट क्रमांक ४६८ मधील आपल्या एक एकर क्षेत्रात दोडक्याचे पीक घेतले होते. या पिकासाठी आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांपर्यंत खर्च झाला होता.

मात्र, काल झालेल्या अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या नुकसानीची दखल घेऊन शासनाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी आत्माराम बोरसे यांनी केली आहे.


Post Top Ad

-->