मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोक्कातील अट्टल गुन्हेगार शस्त्रसाठ्यासह जेरबंद - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, July 7, 2026

मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोक्कातील अट्टल गुन्हेगार शस्त्रसाठ्यासह जेरबंद

 


मेहकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मोक्कातील अट्टल गुन्हेगार शस्त्रसाठ्यासह जेरबंद

मेहकर, प्रतिनिधी : मेहकर पोलिसांनी धाडसी पाठलाग करून मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करत मोठी कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडून धारदार शस्त्रे, मोबाईल आणि कार असा सुमारे २ लाख ६६ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, रिसोड-सोनाटी मार्गावरून मेहकर बायपासमार्गे लाल रंगाची MH-31-FA-5820 क्रमांकाची कार शहरात येत असून, त्यात रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार प्रवास करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला.पोलिसांनी वाहनाला थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत गणपूर फाट्यानजीक वाहन अडविले. कारमधून तिघे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दोन जणांना शिताफीने पकडण्यात यश आले, > नाशिकला रेड अलर्ट! संततधार पावसाने गोदावरीची पाणीपातळी धोक्याच्या दिशेने 🔴 APALA VIDARBH LIVE Video link

 तर एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमोल परात्या भोसले (रा. बरटाळा) आणि अजय दहीमल भोसले (रा. वरदडा, ता. मेहकर) अशी आहेत. वाहनाच्या झडतीत मोठा धारदार सुरा, दोन चाकू, एक सुरी, ऑटोमॅटिक चाकू, रेडमी मोबाईल आणि डॅटसन रेडी-गो कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तपासात अमोल भोसले हा मोक्का अंतर्गत कारवाया तसेच खूनाचा प्रयत्न, दरोडा, शस्त्र बाळगणे, मालमत्तेवरील गंभीर गुन्हे अशा विविध स्वरूपाच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. बुलढाणासह नांदेड, लातूर आणि वाशीम जिल्ह्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या मते, पुढील तपासात आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.फरार आरोपीच्या शोधासाठी परतापूर, उकळी आणि सुकळी परिसरात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले असून त्याचा शोध सुरू आहे.या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५७/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या नेतृत्वाखाली मेहकर पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली

Post Top Ad

-->