RATNAGIRI : रत्नागिरीत गुढीपाडव्याचा जल्लोष; भव्य शोभायात्रांनी शहर दणाणलं - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

RATNAGIRI : रत्नागिरीत गुढीपाडव्याचा जल्लोष; भव्य शोभायात्रांनी शहर दणाणलं


त्नागिरीत गुढीपाडव्याचा जल्लोष; भव्य शोभायात्रांनी शहर दणाणलं

रत्नागिरीत हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरीत गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी सकाळपासून शोभायात्रा काढण्यात येत असून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची भव्य शोभायात्रा विशेष आकर्षण ठरली. मारुती मंदिर ते राम मंदिर या मार्गावर निघालेल्या या शोभायात्रेत मांगल्याचे प्रतीक असलेल्या गुढ्या घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. सुहासिनींनी पारंपरिक वेशभूषेत नटूनथटून उपस्थिती लावल्याने वातावरण अधिकच मंगलमय झालं.एकूणच कोकणात गुढीपाडव्याचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत असून पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे.


Post Top Ad

-->