भिवंडीत मराठी नववर्षानिमित्त ढोलताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा
गुढीपाडव्याच्या निमित्ताने भिवंडी शहरात उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. टिळक चौक मित्र मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत गणपती मंदिर, ब्राम्हण आळी, वाणी आळी, कासार आळी मार्गावरून जल्लोषात मिरवणूक पार पडली. या शोभायात्रेत आबालवृद्ध नागरिक, महिला, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिलांनी ढोलताशा, लाठीकाठी आणि पारंपरिक खेळांचे सादरीकरण करत उत्साहात भर घातली.भिवंडीत पारंपरिक उत्साह आणि सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळाल्याने शहरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले आहे.
.jpg)