BULDHANA | इदगाह मैदानावर रमजान ईद उत्साहात साजरी झाली; मुस्लीम बांधवांकडून बंधुभाव आणि शांततेचा संदेश - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, March 21, 2026

BULDHANA | इदगाह मैदानावर रमजान ईद उत्साहात साजरी झाली; मुस्लीम बांधवांकडून बंधुभाव आणि शांततेचा संदेश

  इदगाह मैदानावर रमजान ईद उत्साहात साजरी झाली; मुस्लीम बांधवांकडून बंधुभाव आणि शांततेचा संदेश

 इदगाह मैदानावर रमजान ईद उत्साहात साजरी झाली; मुस्लीम बांधवांकडून बंधुभाव आणि शांततेचा संदेश
 बुलडाणा  संपूर्ण देशभरासह खामगाव शहरातही रमजान ईद (ईद-उल-फित्र) मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. सजनपूरी येथील मुख्य इदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्र येत ईदची विशेष नमाज अदा केली. ​नमाज पठणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मौलानांनी ईदच्या सणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी आपल्या भाषणात 'शांतता, एकता आणि परस्पर बंधुभाव' जपण्याचे आवाहन केले. "ईद हा सण केवळ आनंदाचा नसून तो आपापसातील हेवेदावे विसरून एकमेकांशी प्रेमाने वागण्याचा संदेश देतो असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी विशेष प्रार्थना करण्यात आली. मौलानांनी भारत देशाच्या प्रगतीसाठी, समृद्धीसाठी आणि शांततेसाठी ईश्वराकडे प्रार्थना केली. भारतावर कोणाचीही वाईट नजर पडू नये आणि संपूर्ण मानवजातीचे रक्षण व्हावे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post Top Ad

-->