अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी; दरवाढ किंवा पंप बंद होणार नसल्याचे मालकाचे स्पष्टीकरण
छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल पंप बंद होणार आणि पेट्रोलचे दर वाढणार अशा अफवा सोशल माध्यमांवर पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या अफवांमुळे दुपारपासूनच शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मात्र पेट्रोल पंप चालकांनी या सर्व अफवा फेटाळून लावत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारची दरवाढ होणार नाही किंवा पेट्रोल पंप बंद होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पेट्रोल पंप चालक म्हणाले की, “सध्या पेट्रोल पंप बंद होणार किंवा दरवाढ होणार अशी कोणतीही अधिकृत माहिती नाही. काही लोकांनी अफवा पसरवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करू नका.”
.jpg)