GONDIA | गोंदियात जंगली हत्तींचा धुमाकूळ, 42 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, थर्मल ड्रोनद्वारे हत्तींच्या हालचालींवर नजर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, March 24, 2026

GONDIA | गोंदियात जंगली हत्तींचा धुमाकूळ, 42 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, थर्मल ड्रोनद्वारे हत्तींच्या हालचालींवर नजर


 गोंदियात जंगली हत्तींचा धुमाकूळ, 42 शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, थर्मल ड्रोनद्वारे हत्तींच्या हालचालींवर नजर

 गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रातील वडेगाव-बंध्या परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने पुन्हा धुमाकूळ घातला आहे. मागील सहा दिवसांपासून हत्तींच्या हालचाली सुरू असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 11 मार्चपासून या भागात सक्रिय असलेल्या हत्तींच्या कळपामुळे मका व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत 42 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत, तर सध्या सुरू असलेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. एकूण नुकसान सुमारे 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. वन विभागाकडून थर्मल ड्रोनच्या मदतीने हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून, विशेष गस्तीचेही आयोजन करण्यात आले आहे. मनुष्यहानी टाळण्यासाठी नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे जंगलात किंवा शेतात जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Post Top Ad

-->