सिंधुदुर्गात अवकाळी पावसाची हजेरी; आंबा-काजू पिकांना धोका, उष्म्यापासून दिलासा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मागील काही दिवसांपासून तळकोकणात उष्म्याची तीव्रता वाढली होती. हवामान विभागाने यापूर्वीच यलो अलर्ट जारी केला होता.
दुपारच्या सत्रात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचे आगमन झाले. काही ठिकाणी किरकोळ गारपीटही झाली.
या अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या शिल्लक पिकांना धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही काळ गारव्याचा दिलासा मिळाला.
.jpg)