Jalgaon: भडगाव विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये गारपिटीने मका, ज्वारी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 19, 2026

Jalgaon: भडगाव विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये गारपिटीने मका, ज्वारी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान


डगाव विधानसभा मतदारसंघात अनेक गावांमध्ये गारपिटीने मका, ज्वारी, बाजरी पिकांचे मोठे नुकसान

 पाचोरा  भडगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने परिसर झोडपून काढला. या पावसामुळे अनेक गावांतील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द, वाघुलखेडा, खडकदेवळा या शिवारांमध्ये काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काल रात्री अचानक झालेल्या या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेला आहे.

या वादळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, त्वरित पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Post Top Ad

-->