विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची ३६ तासांनंतर सुखरूप सुटका
रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे येथे विहिरीत पडलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याची तब्बल ३६ तासांनंतर वनविभागाने यशस्वी सुटका केली आहे. विहिरीच्या कपारीत दबा धरून बसलेला हा बिबट्या पिंजऱ्यात येण्यास तयार नसल्याने वनविभागाने अनोखी शक्कल लढवली.
कोळंबे येथील आंबाबागेतील सुमारे ५० फूट खोल विहिरीत हा बिबट्या पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागाने दोन मोठे टँकर मागवून विहिरीत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाण्याची पातळी हळूहळू वाढू लागल्याने कपारीत लपलेला बिबट्या घाबरून बाहेर आला आणि समोर लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.
यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात आले. कोणतीही दुखापत न होता त्याची सुटका करण्यात आली असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रत्नागिरी येथे आणण्यात आले आहे.
.jpg)