Solapur: सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरातविरोधात महिला काँग्रेस आक्रमक - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, March 23, 2026

Solapur: सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरातविरोधात महिला काँग्रेस आक्रमक


 सोलापुरात भोंदूबाबा अशोक खरातविरोधात महिला काँग्रेस आक्रमक

मध्ये कथित भोंदूबाबा अशोक खरात यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन केले. काँग्रेस भवनासमोर झालेल्या या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

महिला नेत्यांनी आरोप केला की, अशा भोंदूबाबांकडून महिलांची फसवणूक व शोषण केले जाते. “महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी अशा लोकांकडे जातात, मात्र त्यांचा गैरफायदा घेतला जातो,” असे त्यांनी म्हटले.

या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

तसेच, माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर  यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया देत कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला.


Post Top Ad

-->