धावत्या मिनी ट्रॅव्हल्सला भीषण आग; वाहन जळून खाक, प्रवासी बचावले
धावत्या मिनी ट्रॅव्हल्सला भीषण आग; वाहन जळून खाक, प्रवासी बचावले
वर्धा येथून नांदेडकडे जात असलेल्या मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी विमानतळ परिसराजवळ अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही वेळातच संपूर्ण ट्रॅव्हल्स आगेच्या भक्ष्यस्थानी सापडून पूर्णतः जळून खाक झाली.
या मिनी ट्रॅव्हल्समध्ये सुमारे दहा प्रवासी प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालक व प्रवाशांनी तत्काळ वाहनाबाहेर पडत जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिनी ट्रॅव्हल्सचा क्रमांक MH27 0059 असल्याची माहिती मिळाली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.
.jpg)