Jal Jeevan Mission जलजीवन मिशन घोटाळा? कोट्यवधींच्या निधीवर प्रश्नचिन्ह! - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, April 7, 2026

Jal Jeevan Mission जलजीवन मिशन घोटाळा? कोट्यवधींच्या निधीवर प्रश्नचिन्ह!


जल जीवन मिशन घोटाळा? कोट्यवधींच्या निधीवर प्रश्नचिन्ह!

काम पूर्ण दाखवूनही गावात पाणी टंचाई कायम; अपहार, खोटी नोंद व दिशाभूल प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल..

बुलढाणा,  मेहकर तालुक्यातील नागपूर येथे जलजीवन मिशनच्या नावाखाली कोट्यवधींच्या निधीची उधळपट्टी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. “हर घर नल, हर घर जल” या योजनेचा फक्त कागदोपत्री गाजावाजा करून प्रत्यक्षात गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने संतापाचा ज्वालामुखी उसळला आहे.सुमारे ₹1 कोटी 25 लाख 34 हजारांचा निधी मंजूर झाल्यानंतरही गावात पाण्याचा थेंब नाही, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उभी करत आहे. कागदावर काम पूर्ण, पण प्रत्यक्षात योजना ठप्प — हा प्रकार म्हणजे सरळसरळ जनतेची फसवणूक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

पाणी कुठे गेलं? हा थेट सवाल आता नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. महिला आणि नागरिकांना अजूनही पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे, तर कागदावर मात्र सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवले जात आहे.या प्रकरणात शासकीय निधीचा अपहार, खोटी नोंद, जाणूनबुजून दिशाभूल आणि कर्तव्यच्युती यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी होत आहे.ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.‌ तसेच, तांत्रिक ऑडिट करून संपूर्ण कामाची चौकशी करण्यात यावी आणि दोषींना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, आता प्रशासन कारवाई करते की प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमसभेत “सर्व ठीक”चा दावा, प्रत्यक्षात काम अपूर्ण!दि. 31 मार्च रोजी झालेल्या वार्षिक आमसभेत आमदार सिद्धार्थ खरात, अनेक अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता धाबे यांनी गावातील जलजीवन मिशन योजना पूर्ण झाल्याची घोषणा केली. तसेच, “गावात पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे,” असेही त्यांनी सर्वांसमोर स्पष्टपणे सांगितले.मात्र, या दाव्याच्या पूर्णपणे विरुद्ध वास्तव समोर येत आहे.पाण्याच्या टाकीचे काम अद्याप अपूर्णगावातील पाइपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेजविहिरीवर लाईनची कोणतीही योग्य व्यवस्था नाहीअशा अनेक त्रुटी असतानाही योजना पूर्ण झाल्याचे सांगून लोकप्रतिनिधींना खोटी माहिती देण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. यामुळे केवळ नागरिकांचीच नव्हे, तर लोकप्रतिनिधींचीही दिशाभूल करण्यात आल्याची चर्चा जोर धरत आहे.

तक्रारी दाखल.. आता चौकशी की फाईल दडपशाही?या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी नागपूर वाशी यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत.मात्र आता सर्वांचे लक्ष एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे लागले आहे —या तक्रारींवर खरोखरच चौकशी होणार का? की पुन्हा एकदा फाईल कचराकुंडीत जाईल?प्रशासन या प्रकरणावर ठोस कारवाई करून सत्य बाहेर आणणार की हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होणार, याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे आता प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Post Top Ad

-->