Crime News तरुणाची हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, परिसरात खळबळ - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, June 21, 2026

Crime News तरुणाची हत्या; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, परिसरात खळबळ

 


शिरपूर पोलिस ठाण्यात FIR नोंद; मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप..!

रिसोड. तालुक्यातील उकिरखेड येथील 24 वर्षीय अभिषेक विष्णू वाघ या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जय हरी विठ्ठल’च्या गजरात श्रींचे प्रस्थान; शेगाव ते पंढरपूर भक्तिमय वारीला सुरुवात VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी सायंकाळी पिंपरी सरहद परिसरातील एका पेट्रोलपंपाजवळ अभिषेक वाघ अभि शुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याला काही जणांनी बोलावून नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याच्यावर मारहाण झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गंभीर अवस्थेत असलेल्या अभिषेकला प्रथम मेहकर येथील रुग्णालयात आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

उपचार सुरू असताना 20 जून रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार आनंद विनोद मवाळ, प्रतीक संतोष हुंबाळ, पवन गजानन दांदडे व शुभम शेषराव अवचार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 103(1), 351(2), 351(3) आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत असून मृत्यूमागील नेमके कारण आणि घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे. अभिषेक वाघ मृत्यू प्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

Post Top Ad

-->